महाराष्ट्र महाभूलेख 7/12, 8A ऑनलाइन पहा -bhulekh.mahabhumi.gov.in

Join whatsapp Channel Join Now

महाराष्ट्र सरकार द्वारा राज्यातील नागरिकांसाठी महाभूमी अभिलेख पोर्टलच्या ऑनलाईन माध्यमातून महाभूलेख (Mahabhulekh) जमिनीच्या नोंदी तयार केल्या आहेत. महाराष्ट्राच्या जमिनीचे रिकॉर्ड कंप्यूटराइज्ड करण्यासाठी हे करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारे नागरिक घरबसल्या स्वत:चे जमिनीच्या 7/12 (साताबारा), 8अ आणि मालमत्ता पत्रक ची ऑनलाइन प्रत (नकल) सहजपणे मिळवू शकतो.

शासनाचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय पुणे शहरात आहे. शासनाने नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोंकण, अमरावती राज्यातील प्रमुख ठिकाणांद्वारे या पोर्टलचा विस्तार केला आहे. महाराष्ट्र शासन (NIC) नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने महाराष्ट्र महसूल विभागाच्या सहकार्याने आपली ऑनलाइन सिस्टम तयार केली आहे, तिला महाराष्ट्र भूमी अभिलेख असेही नाव देण्यात आले आहे.

MAHA Bhulekh (Maharashtra Bhumi Abhilekh maha abhilekh) ही महाराष्ट्र राज्याची भूमी अभिलेख वेबसाइट आहे जी नागरिकांना ऑनलाइन ७/१२ आणि ८अ प्रदान करते. या आर्टिकलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महाराष्ट्र महाभूलेख संबंधित माहिती सांगणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत हा आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

Table of Contents

महाभूलेख 7/12 (Mahabhulekh) संबंधित महत्वाची महिती

Maharashtra Land Records संबंधित सर्व महत्वाची महिती खालील दिली आहे.

योजनेचे नावमहाभूलेख, MAHA Bhulekh
सुरुवातमहाराष्ट्र सरकार 
लाभार्थीमहाराष्ट्रातील नागरिक
योजनेचे उद्दिष्टमहाराष्ट्रातील सातबारा आणि जमिनीशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी
महाभूलेख वेबसाइटhttps://bhulekh.mahabhumi.gov.in/
सातबारा बघणेhttps://digitalsatbara.mahabhumi.gov.in/

महाभूलेख (Mahabhulekh) चा उद्देश्य

शासनाने महसूल विभाग द्वारा 7/12 तयार केले आहेत, 7/12 मध्ये जमिनीची संपूर्ण माहिती जसे की जमिनीचा सर्व्हे नंबर, जमिनीचा मालक, जमिनीची लांबी रुंदी, शेतीचे नाव, शेतीचे वर्णन, शेतीतील शेवटचे पीक कोणती होती. आणि कोणती लागवड केली आहे, जमीन पावसाने किंवा स्वतःच सिंचन केली आहे का. 7/12 मध्ये सरकारी एजन्सी द्वारा जमिनीच्या मालकाला दिलेल्या कर्जाचा तपशील देखील आहे. जमिनीच्या मालकाने घेतलेले कोणतेही कर्ज आणि मालकीशी संबंधित सर्व कागदपत्रे यासारख्या जमिनीवर मालकाने केलेल्या खर्चाच्या सर्व नोंदी ऑनलाइन केल्या जातात.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024

महाभूलेखा चे लाभ

Mahabhulekh Portal चा माध्यमातून नागरिकांना जमिनीच्या तपशीलाची सर्व माहिती ऑनलाइन मिळते. महाभूलेखच्या माध्यमातून काय-काय लाभ मिळतो ते आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या यादीत माहिती मिळवून देऊ. या स्टेप्स काळजीपूर्वक वाचा.

  • महाभूलेख पोर्टलवरून संपूर्ण महाराष्ट्राच्या जमिनीशी संबंधित माहिती ऑनलाइन माध्यमातून तपासली जाऊ शकते.
  • यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात (तलाठी कार्यालयात) जाण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा फोनवरूनही ऑनलाइन पाहू शकता.
  • या पोर्टलमध्ये महाराष्ट्रातील सर्व जमिनीच्या नोंदी ऑनलाइन उपलब्ध आहे.
  • तुम्ही तुमच्या जमिनीचा तपशील 7/12, 8A आणि मालमत्ता पत्रक घरी बसून पाहू शकता.

महाभूलेख विभाग संबंधित जमिनीच्या रिकॉर्ड (नोंदी)

अमरावती
(अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम)
औरंगाबाद
(उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली)
कोंकण
(ठाणे, पालघर, मंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग)
नागपूर
(गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा)
नाशिक
(अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक)
पुणे
(कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर)
७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा

महाभूलेख पोर्टलवरून ऑनलाइन 7/12 आणि  8A कसे पहावे?

मित्रानो 7/12 आणि 8A ऑनलाइन पाहण्यासाठी महाभुलेखच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.  ज्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

  • आता तुमच्यासमोर Maha bhumi abhilekh महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे वेबपेज उघडले.
महाभूलेख पोर्टलवरून ऑनलाइन 7/12 आणि  8A कसे पहावे?
  • यानंतर तुम्हाला 7/12 (सताबारा), 8A आणि मालमत्ता पत्रक यापैकी कोणतीही एक निवडावा लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि गाव निवडावा लागेल.
  • आता तुम्हाला तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर / गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नावमधील नावआडनावसंपूर्ण नाव यापैकी कोणतेही एक निवडावा लागेल.
  • आता तुमचा मोबाइल क्रमांक टाका.
  • आता तुम्हाला वेरीफिकेशन साठी कॅप्चा टाकावा लागेल.
  • आता तुमच्या समोर जमिनीचा 7/12 (सताबारा) किंवा 8A  येईन.

Also Read: MahaDbt शेतकरी योजना 2024 नवीन अर्ज सुरू 2024

डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (Digital 7/12), 8A, फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड  कसे पहावे?

Digitalsatbara.mahabhumi पोर्टलवर लॉगिन कसे करावे?

  • Digital 7/12, 8A, property card मिळविण्यासाठी, प्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in बटणावर पोर्टलवर लॉग इन करा.
  • आता तुम्हाला New User Registration बटणावर क्लिक कराव लागेल.  ज्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
  • New User Registration करण्यासाठी तुम्हाला पर्सनल इंफॉर्मेशन, एड्रेस इंफॉर्मेशन, लॉगिन इंफॉर्मेशन आणि पासवर्ड निश्चित कराव लागेल.
  • Digitally signed 7/12, 8A, property card, फेरफार मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभाग (Mahabhulekh) शुल्क भरावे लागेल.
  • तुम्हाला महाभूमी पोर्टलवर तुमचे खाते डिजिटलसातबारासाठी रिचार्ज करावे लागेल.
  • मोबाईल रिचार्जप्रमाणेच हे खाते  बँक खाते, क्रेडिट कार्ड, UPI ऑनलाइन पेमेंट पद्धतीने रिचार्ज केले जाऊ शकते.
digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/Registration/UserRegistration

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ (Digital 7/12) – DIGITAL SIGNATURE SATBARA डाउनलोड कसा करावा?

  • सर्वप्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  • त्यानंतर Digital Satbara बटणावर क्लिक कराव लागेल.  ज्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.
  • जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर/ गट नंबर (Survey No./Gat No.) निवडा.
  • डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ (Digital signature satbara) मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
  • डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ESign 7/12 डाउनलोड करा.
  • Digital 7/12 डाऊनलोड केला नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जाऊन तो डाउनलोड करू शकता.
  • डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (Digital Satbara) सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
डिजिटल स्वाक्षरीत ८अ - DIGITAL SIGNED 8A डाउनलोड कसा करावा?

डिजिटल स्वाक्षरीत ८अ – DIGITAL SIGNED 8A डाउनलोड कसा करावा?

  • प्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  • आता जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • त्यानंतर 8A खाते क्रमांक किंवा नाव निवडा.
  • जर तुम्हा ला खाते क्रमांक माहित नसेल तर तुमही पहिले नाव, मधले नाव किंवा आडनाव लिहा.
  • येथे तुमच्या नावासोबत तुमचा खाते क्रमांकही दिसेल.
  • डिजिटल स्वाक्षरीत ८अ (Digital signature 8A) मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
  • डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ESign 8A डाउनलोड करा.
  • Digital 8A डाऊनलोड केला नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जाऊन तो डाउनलोड करू शकता.
  • डिजिटल स्वाक्षरीत 8A (Digital 8A) सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.
  • हे खाते रेकॉर्ड 7/12 डिजिटली स्वाक्षरीत केलेल्या डेटावर आधारित आहे, त्यामुळे स्वाक्षरी आवश्यक नाही.
डिजिटल स्वाक्षरीत ८अ - DIGITAL SIGNED 8A डाउनलोड कसा करावा?

डिजिटल स्वाक्षरीत महाभूलेख प्रॉपर्टी कार्ड – DIGITALLY SIGNED PROPERTY CARD डाउनलोड कसा करावा?

  • डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  • त्यानंतर विभाग(Region), जिल्हा(District), कार्यालय(Office), गाव(Village) सी.टी.एस नंबर. (CTS No.) निवडा
  • डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड (Digitally signed property card) मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 45 भरावे लागतील. (हे पेमेंट शहरी विभागात ₹ 90, ₹ 135 असू शकते)
  • डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल esigned प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करा.
  • Digital eSigned property card डाऊनलोड झाल नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जाऊन तो डाउनलोड करू शकता.
  • डिजिटल स्वाक्षरीत 8A (Digital 8A प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर कारणांसाठी वापरले जाऊ शकते.
डिजिटल स्वाक्षरीत महाभूलेख प्रॉपर्टी कार्ड – DIGITALLY SIGNED PROPERTY CARD डाउनलोड कसा करावा?

डिजिटल स्वाक्षरीत फेरफार – DIGITALLY SIGNED eFERFAR डाउनलोड कसा करावा?

  • स्वाक्षरीत फेरफार (Digital eFerfar) मिळवण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
  • जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation No.) निवडा.
  • डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally Signed eFERFAR) मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 100 भरावे लागतील.
  • डाउनलोड बटण क्लिक करा आणि डिजिटल esigned फेरफार डाउनलोड करा.
  • eSigned फेरफार डाऊनलोड झाल नसेल तर पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जाऊन तो डाउनलोड करू शकता.

महाभूलेख सातबारासाठी जिल्हा प्रशासनाच्या काही वेबसाईट लिंक्स

बुलढाणाhttps://buldhana.nic.in/
अकोलाhttps://akola.gov.in/mr/service/सातबारा७-१२/
वाशिमhttps://washim.gov.in/service/सातबारा-7-12/
अमरावतीhttps://amravati.gov.in/mr/service/भूमिअभिलेख-व-७-१२-उतारा/
यवतमालhttps://yavatmal.gov.in/mr/service/भूमी-अभिलेख-व-७-१२-उतारा/
नांदेड़https://nanded.gov.in/mr/service/सातबारा/
हिंगोलीhttps://hingoli.nic.in/mr/
परभणीhttps://parbhani.gov.in/mr/service/भूमी-अभिलेख/
जालनाhttps://jalna.gov.in/mr/
औरंगाबादhttps://aurangabad.gov.in/mr/service/सात-बारा-उतारा/
बीडhttps://beed.gov.in/service/सातबारा७-१२/
लातूरhttps://latur.gov.in/en/service/satbara7-12/
उस्मानाबादhttps://osmanabad.gov.in/mr/service/7-12-पहा/
ठाणेhttps://thane.nic.in/mr/service/संगणकीकृत-७-१२/
मुंबई उपनगरhttps://mumbaisuburban.gov.in/mr/service/7-12-पहा/
रायगडhttps://raigad.gov.in/service/सातबारा-७-१२/
रत्नागिरीhttps://ratnagiri.gov.in/
पालघरhttps://palghar.gov.in/mr/
वर्धाhttps://wardha.gov.in/
नागपूरhttps://nagpur.gov.in/mr/
भंडाराhttps://bhandara.gov.in/
गोंदियाhttps://gondia.gov.in/mr/
गडचिरोलीhttps://gadchiroli.gov.in/mr/
चंद्रपूरhttps://chanda.nic.in/mr/service/land-records-7/
नंदुरबारhttps://nandurbar.gov.in/mr/
धुलेhttps://dhule.gov.in/service/land-records/
जलगांवhttps://jalgaon.gov.in/
नासिकhttps://nashik.gov.in/mr/
अहमदनगरhttps://ahmednagar.nic.in/mr/service/संगणकीकृत-७-१२/
पुणेhttps://pune.gov.in/mr/service/७-१२-बघणे/
सोलापुरhttps://solapur.gov.in/
साताराhttps://www.satara.gov.in/service/भूमी-अभिलेख-आपला-७-१२-पहा/
कोल्हापूरhttps://kolhapur.gov.in/service/7-12-ऑनलाइन/
सांगलीhttps://sangli.nic.in/

महाभूलेख संबंधित काही महत्वाची माहिती

  • जर तुम्हाला ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक दिसत नसेल, तर ब्राउझरमधून पॉप अप अनब्लॉक करा.
  • जर वेबसाइट काम करत नसेल तर याचे कारण असू शकते-
  • सर्व्हर (server) काम करत नसनार.
  • महाराष्ट्र शासनाचे महाभूलेख पोर्टल एकाच वेळी अनेकजण वापरत असतील.

स्वाक्षरीत नसलेल्या सातबारा (7/12) आणि 8A फक्त माहितीसाठी वापरता येईल.

डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (Digital 7/12), ८A आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल.

Mahabhunakasha Maharashtra 2024 | महा भु नक्शा महाराष्ट्र

FAQs – (Mahabhulekh)महाभूलेख संबंधित काही प्रश्न

महाभूलेख म्हणजे काय?

महाभूलेख म्हणजे महाराष्ट्र सरकार द्वारा महाभूमी अभिलेख पोर्टलच्या ऑनलाईन माध्यमातून महाराष्ट्राच्या जमिनीचे रिकॉर्ड कंप्यूटराइज्ड करण्यासाठी हे करण्यात आले आहे. त्यामुळे घरबसल्या स्वत:चे जमिनीच्या 7/12 (साताबारा), 8अ आणि मालमत्ता पत्रक ची ऑनलाइन प्रत (नकल) सहजपणे मिळवू शकता आणि डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा (digital 7/12 online) सुद्धा डाउनलोड करू शकता.

सातबारा उतारा कोण देतात?

सातबाराचा उतारा हा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो.

जुने फेरफार कसे पहावे?

जुने अभिलेख काढण्यासाठी आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करावं लागेल. इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.

डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ (Digital 7/12) कसे डाऊनलोड करावा?

• सर्वप्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉगिन करा.
• त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर/ गट नंबर निवडा.
• डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मिळविण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
• त्यानंतर eSign डिजिटल 7/12 डाउनलोड करू शकता.

8अ चा उतारा म्हणजे काय?

गावातील एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा उतारा म्हणजे 8 अ. एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एका पेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल तर त्याची सर्व माहिती तुम्हाला 8 अ च्या उतार्‍यावर मिळू शकते.

फेरफार कसे बघावे?

फेरफार उतारा काढण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in असं सर्च करा. यानंतर महसूल विभागाचं ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, इथं येऊन 7/12, 8A काढला असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

Join whatsapp Channel Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top